in

भाजपा आमदार आशिष शेलार कोरोना पॉझिटिव्ह

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या कोरोनावर मात करण्यासाठी ‘ब्रेक दी चेन’मधील निर्बंधांची अंमलबजावणी बुधवारी रात्री ८ वाजेपासून राज्यभरात सुरू झाली. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग सर्वसामान्यांपासून ते अनेक राजकीय नेत्यांनाही झाल्याचे समोर आले आहे. आता भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मी आज कोविड 19 ची तपासणी केली असता, माझी चाचणी पॉझिटिव्ह आलीय. मी औषधोपचार आणि डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आलेले आहेत, त्या सर्वांनी स्वत: ला वेगळे ठेवावे आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मी माझ्या कार्यालयामार्फत मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध असल्याचेही आशिष शेलारांनी सांगितले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

SRH vs RCB | बंगळुरुचा ‘रॉयल’ विजय

राज्यात अवकाळी पाऊस; बळीराजा संकटात