in

भाजपाच्या ‘या’ आमदारानं घरीच घेतली कोरोना लस

कोरोनासंदर्भातील नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. कोरोनावरील लस घेण्यांसदर्भातही काही नियम आहेत. पंतप्रधान मोदींनी एम्स रुग्णालयात जाऊन लस घेतली. मात्र, बिहारमधील एका भाजपा उमेदवारानं या सर्व नियमांना धाब्यावर बसवले आहे. आमदार महोदयांनी चक्क घरीच लस घेतली असल्याचं समोर आलं आहे.

बिहारमधील भाजपाच्या एका आमदारानं डॉक्टरांनाच थेट घरी बोलावून घेतलं. घरीच लस टोचून घेतली. आमदार महोदयांवर सर्वस्तरातून टीका करण्यात येत आहे. अशोक सिंह असं आमदारांचं नाव आहे. कोरोना लसीकरण केंद्र किंवा रुग्णालयात न जाता सिंग यांनी घरीच लस घेतली आहे. दरम्यान, याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

coronavirus: देशात पुन्हा लागणार लॉकडाऊन?

Maharashtra Lockdown | आता 25 जणांच्या उपस्थितीतच उरकावं लागणार ‘शुभमंगल’