in

भाजपा-राष्ट्रवादीत खलबतं? राज्यात नव्या सत्तासमीकरणाचे वारे…

राज्यात नव्या सत्तासमीकरणाला वेग आला आहे. एकीकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी जोर धरत असताना, दुसरीकडे राज्यात सत्तासमीकरणाला वेग आला आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत दोन्ही पक्षांकडून अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र राज्यात सत्तांतरण होऊन मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रविवारी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन बड्या नेत्यांची गुप्त बैठक पार पडली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या बैठकीत राज्याच्या नवीन राजकीय समीकरणाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सचिन वाझे प्रकरणावरून विरोधकांनी रान उठवले होते. यामध्ये विरोधी पक्षांकडून शिवसेनेला सतत टार्गेट करण्यात आले. त्यामुळे विरोधकांच्या आरोपानंतर सरकार बॅकफुटवर आल्याचेही चित्र दिसून आले. दरम्यान नुकतीच एनआयएने सचिन वाझे यांची कसून चौकशी करत त्यांना अटक केली. सूत्रांकडून अशी माहिती मिळतेय की, एनआयएला मिळालेली माहिती भाजपच्या बड्या नेत्यापर्यंत पोहोचली. या घटनेची कुणकुण राष्ट्रवादीला लागताच सावध भूमिका घेतली आणि तातडीने पावल उचलत ही बैठक झाली असल्याची माहिती आहे.

दरम्यान भाजपकडे नक्कीच अशी काही ठोस माहिती असेल जेणेकरून महाविकास आघाडीत एकंदरीत फूट पडून राष्ट्रवादी आता भाजपसोबत नवीन घरोबा करण्याच्या तयारीत असेल. त्यामुळेच भाजप -राष्ट्रवादी एकत्र येऊन राजकीय समीकरण बदलण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय. त्यात आता हे नवीन समीकरण राज्यात दिसेल का ? तसेच भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या दोन बड्या नेत्यांच्या शपथविधी पुन्हा पाहता येणार का ? असे सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात मिळतील इतकं मात्र नक्की.

दोन्ही पक्षाकडून याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नाही आहे. पण राष्ट्रवादीच्या सुत्रांच्या माहितीनुसार हा भाजपचा खोडसाळपाना असावा.

What do you think?

-92 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Realme 8, Realme 8 Pro च्या प्री-बुकींगला सुरूवात

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध