in

Nashik oxygen leak: ”भाजपने नाशिक दुर्घटनेची जबाबदारी घ्यावी”

नाशिकमधील झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्ण दगावल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. या घटनेवरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. या दुर्घटनेची जबाबदारी भाजपने स्वीकारली पाहिजे अशी टीका कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

सचिन सावंत म्हणालेत, ‘झाकिर हुसेन रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्याची मागणी आम्ही करतो. या घटनेला जबाबदार असलेल्यांना अटक करायला हवं. हे रुग्णालय नाशिक महापालिकेचं आहे आणि महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे भाजपने या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. महापौर आणि भाजपचे 3 आमदार कुठे आहेत? ते फरार झाले काय?’ असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना जामीन मंजूर

मीरा रोडमध्ये रेमडिसिव्हर इंजेक्शन्सची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या दोघांना अटक