in

ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, मुंबईत महापालिका करणार घरोघरी जाऊन लसीकरण

कोरोना लसीकरणात ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागतेय. लाईन उभे राहणे, यासह नागरिकांची गर्दी या सर्व समस्यांमुळे होणारी फरफट पाहता मुंबई महापालिकेने आता वॉर्ड रचनेनुसार लसीकरणाचे कँप सुरू करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या संदर्भातली संकेत आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत.

हायकोर्टात पार पडलेल्या एका बैठकीत बोलताना आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी, महापालिका पुढील आठवड्यापासून वॉर्ड रचनेनुसार लसीकरणाचे कँप सुरू करण्याच्या विचारात आहे. ज्यातून 70 हजार लोकांचं लसीकरण करण्याचा पालिकेचा प्रयत्न असेल, अशी माहिती दिली. हायकोर्टात लसीकरणा संदर्भातील एका सुनावणी दरम्यान मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी गोष्ट जाहीर केली. मुंबईत प्रभागवार रचनेनुसार एकूण 227 वॉर्ड आहेत. तेव्हा प्रत्येक वॉर्डात एक यानुसार हे कँप सुरू होण्याची शक्यता आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Weather Forecast | येत्या 5 दिवसांत पुण्यासह राज्यात पावसाचा इशारा

Lokshahi Impact;लोकशाहीच्या बातमीनंतर प्रशासन जागे; ऑक्सिजन टँकर मिरजमध्ये दाखल