in

कोरोनाचा मुक्काम इमारतीत : बीएमसीकडून ३०५ इमारती सील

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. सहा दिवसात १३ हजार रुग्ण आढळले आहेत. मुंबईत स्फोट झाल्याप्रमाणे आकडेवारी वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबईतील ३०५ इमारती सील केल्या आहेत.

कोरोना प्रसार रोखण्यासाठी बीएमसीनं वेगानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत ७ ऑक्टोबर 2020 रोजी म्हणजे गेल्यावर्षी उच्चांकी रुग्णसंख्येची नोंद झाली होती. एका दिवसातील ती रुग्णसंख्या २ हजार ८४८ इतकी होती. त्यानंतर पहिल्यांदाच हा आकडा तीन हजारांच्या पुढे गेला आहे.

मनपाकडून कंटेनमेंट झोन तयार केले जात आहेत. तसंच मॉल्स, सिनेमागृहांसह सार्वजनिक ठिकाणी चाचण्या करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे, तर दुसरीकडे रुग्ण आढळून येणाऱ्या इमारती सील केल्या जात आहेत. मागील काही दिवसात रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. १३ मार्च रोजी मुंबईत ३१ कंटेनमेंट झोन होते, तर २२० इमारती सील करण्यात आल्या होत्या. १८ मार्च रोजी त्यात मोठी वाढ झाली. कंटेनमेंट झोन ३४ झाले असून ३०५ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जो बायडन विमानाच्या पायऱ्या चढताना तीनवेळा घसरले

महासत्ता म्हणून पुढे येणारा भारत आनंदी आहे का? सर्वेक्षणाचा ‘हा’ आला निष्कर्ष…