in

Covid Positive | कार्तिक आर्यनला करोनाची लागण

राज्यात कोरोना पुन्हा आपले डोके वर काढताना दिसत आहे. मुंबईमध्ये कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी कोरोनाचं संकट टळलेलं नाही. अभिनेता रणबीर कपूरनंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, अभिनेता मनोज बायपेयी अशा अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली होती. आता अभिनेता कार्तिक आर्यन (kartik aaryan) याला सुधा कोरोनाची लागण झाली आहे.

कार्तिक आर्यनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत स्वत: त्याच्या चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. कार्तिकने एक प्लसचं चिन्ह असलेला फोटो शेअर केला आहे. “पॉझेटिव्ह हो गया. दुवा करो” असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. अनेक चाहत्यांनी कार्तिकला लवकर बरा हो असं कमेंटमध्ये म्हंटलं आहे.

नोव्हेंबर महिन्यात रिलीज होणाऱ्या ‘भुलभुलैया-2’ मध्ये कार्तिक मुख्य भूमिकत झळकणार आहे. याच सिनेमाच्या शूटींगमध्ये तो गेल्या काही दिवसांपासून व्यस्त आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राजेश टोपे LIVE | २ दिवसात लॉकडाऊनचा निर्णय घेणार

शरद पवारांकडून अनिल देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न – सुधीर मुनगंटीवार