in ,

बॉलीवूड सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवर; ‘या’ निर्मात्याच्या घरी आणि कार्यालयावर छापे

एनसीबीने आज सकाळी मुंबईच्या वांद्रे भागात चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांच्या घरी आणि कार्यालयावर छापा टाकला आहे. एनसीबीने इम्तियाज खत्रीवर मुंबई रेव्ह पार्टी प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला आहे. एनसीबीने अचानक हा छापा मारला असून त्यांनी या छाप्याची लिंक क्रूझ जहाजावरील छाप्याच्या प्रकरणाशी संबंधित आहे असे सांगितले आहे. यापूर्वी इम्तियाज खत्रीवर ड्रग्जचा पुरवठा केल्याचादेखील आरोप आहे.

इम्तियाज खत्री हा मुंबईच्या एका प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा आहे. इम्तियाज खत्रीचे बॉलीवूडमधील अनेक मोठ्या स्टार्सशी जवळचे संबंध आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणातही ड्रग्जचा पुरवठा केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यावेळी त्याची एनसीबीमार्फत अनेकवेळा चौकशीदेखील करण्यात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

फेसबुक, व्‍हॉटसअॅप स्‍टेटस ठेवण्‍यापेक्षा देशाचे स्‍टेटस कसे उंचावेल याकडे लक्ष द्या..

लोकशाही इम्पॅक्ट : मुख्यमंत्र्यांकडून बातमीची दखल; ‘त्या’ आंदोलकांची घेणार भेट