in

Break the chain | लग्नाला नक्की यायचं ! पण …

देशात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. तर दुसरीकडे लग्नसराईचा हंगामही सुरू आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून लग्न सोहळे कमी लोकांच्या उपस्थितीत होत आहेत . मात्र जयपूरमधील एका लग्नसोहळ्याच्या आमंत्रण पत्रिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, लग्नाला येणाऱ्या सर्व पाहुण्यांना त्यांचा आरटी पीसीआर (RT-PCR) रिपोर्ट दाखवणं बंधनकारक केलं आहे. इतकंच नाही तर वधू-वराने आपल्या लग्नपत्रिकेत स्पष्टपणे लिहिले आहे, लग्नाला आवर्जून या, पण तुमचा आरटी पीसीआर रिपोर्ट सोबत आणा…

जयपूरमधील विजय आणि वैशाली यांचा विवाह २४ एप्रिल रोजी होणार आहे . कोरोनाच्या वाढत्या संसर्गादरम्यान, वर-वधू दोघांच्या कुटुंबीयांकडून सावधगिरी बाळगली जात आहेत. या विवाहाचे आंमत्रण डिजिटल स्वरूपात पाहुण्यांना देण्यात आले आहे. पत्रिकेत पाहुण्यांना अॅन्टिजेन टेस्ट नाही तर RT PCR टेस्टचा रिपोर्ट सोबत आणण्यास विनंती केली आहे. दोन्ही कुटुंबीयांकडून असे सांगण्यात आले आहे. तसेच या लग्नाच्यावेळी मास्क आणि हात सॅनिटाईझर देण्याची व्यवस्था देखील असणार आहे.

दरम्यान, राज्यात लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभाबाबत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली असून याआधी लग्न समारंभाकरता ५० जणांची उपस्थिती होती. मात्र, आता ५० नाही तर केवळ २५ जणांच्या उपस्थितीत लग्न करावे लागणार आहे. आज रात्री ८ वाजल्या पासून नवे नियम लागू करण्यात आले आहेत. यामध्ये लग्न समारंभाबाबत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुलाला मिठीत घेऊन आई-वडिलांची नदीत उडी मारून आत्महत्या

बळीराजासाठी यंदा पाऊस सुखावणारा