in

अंबरनाथमध्ये पुलाचे रेलिंग्ज तुटल्याची घटना; वाहतूकदारांना अपघाताची भीती

मयरेश जाधव | अंबरनाथ शहरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे प्राचीन शिवमंदिराच्या पुलाचे रेलिंग्ज तुटल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूकीला अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच या रेलिंग्ज तुटल्याच्या घटनेनंतर त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातेय.

अंबरनाथ शहरात मागील ४ दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे वालधुनी नदीला मोठा पूर आला. यानंतर प्राचीन शिवमंदिरात जाणारे वालधुनी नदीवरील पूल २ वेळा नदीच्या पाण्याखाली गेले. नदीच्या पाण्याला मोठा प्रवाह असल्यामुळे या पुलाचे लोखंडी रेलिंग्ज तुटून पडले आहेत. तर पुलावरील चेकर्ड टाईल्स सुद्धा वाहून गेल्या आहेत. यामुळे सध्या पाण्यात बुडालेल्या पुलावरील प्रवास धोकादायक बनला आहे.

विशेष म्हणजे या पुलाची काही महिन्यांपूर्वीच अंबरनाथ पालिकेनं दुरुस्ती करून मजबुतीकरण केलं होतं. मात्र त्यानंतर नदीला आलेल्या पहिल्याच पुरात रेलिंग्ज तुटून पडल्यानं कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. तसेच आता अंबरनाथ नागरपालिकेनं तातडीनं या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरतेय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘रावसाहेब’ चे मोशन पोस्टर रिलीज…

रायगड जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच