परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. भाजपने अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावरून मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. राज्यातील पोलीसांची खाती ही स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली?, असा प्रश्न भाई जगताप यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे हा विषय फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. अमृता फडणवीस ट्विट करत भाई जगताप यांना चांगलंच फटकारलं आहे.
यासंदर्भात, अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत, “ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यत तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक ‘ ला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय!” असे म्हटले आहे.
नेमके काय म्हणाले होते भाई जगताप?
मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशमुखांचा राजीनामा घेण्यात यावा, असे म्हटले आहे. याच मुद्द्यावरून, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावे, असे भाई जगताप यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरूनच अमृता फडणवीस यांनी त्यांना अक्रमक प्रत्युत्तर दिले आहे.
Comments
Loading…