in

Budget session | सभागृहात गोंधळ; आमदारांमध्ये धक्काबुक्की

महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. अधिवेशन सभेच्या सुरुवातीला मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांच्या पत्नी विमला यांचा तक्रार अर्जच वाचून दाखवला. त्यानंतर सभागृहात गोंधळ होऊन विरोधांकडून घोषणाबाजी करण्यात आली. त्याचवेळी सभागृहात ‘अमित शहा खुनी आहे” अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणावरून भाजप आमदार संतापले आणि सभागृहात गोंधळ निर्माण झाला. परिणामी या घोषणाबाजीनंतर सत्ताधारी- विरोधक एकमेकांच्या अंगावरही धावून गेले. देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून शब्द मागे घ्या, अशी मागणी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा विधानसभेत हिरेन देशमुख प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरले. यावेळी त्यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांचा जबाब वाचून दाखवला. माझ्या पतीची चौकशी वाझे यांनीच केली होती. हिरेन तीन दिवस वाझेंकडेच होते. तसेच हिरने यांची गाडीही चार महिने वाझेंकडेची होती, असं हिरेन यांच्या पत्नीने म्हटलं आहे. त्यामुळे वाझेंना 201 कलमाखाली अटक का झाली नाही? वाझे यांना कोण वाचवतंय? असा सवाल करतानाच हिरेन यांची हत्या गाडीतच करण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

खडसें सहकार्य करत असतील तर अटक करण्याची काय गरज? हायकोर्टाचा ईडीला सवाल

फॅमिली मॅनचा दुसरा सीजन रद्द? मनोज वाजपेयीने दिले उत्तर