शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय असलेले प्रसिद्ध बिल्डर योगेश देशमुख यांना मनी लाँड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. यापूर्वी ईडीने प्रताप सरनाईक यांचा सर्वात जवळचा मित्र अमित चंदेल यांनाही अटक केली होती.
१७ मार्च या दिवशी ईडीने योगेश देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर देशमुख यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ईडीने सरनाईक यांच्या घरावर, कार्यालयात आणि हॉटेल अशा एकूण १० ठिकाणी छापेमारी केली होती. योगेश देशमुख यांना अटक केल्याचे वृत्त प्रताप सरनाईक यांच्यावर वेळोवेळी आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
ईडीने प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापा टाकला तेव्हा ते भारतात नव्हते. आपल्या मालकीच्या विविध ठिकाणी ईडीचे छापे पडल्याचे समजल्यानंतर ते भारतात परतले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेटही घेतली होती. डीने अशा प्रकारची ही कारवाई का केली? कशासाठी केली? याची आपल्याला काहीएक कल्पना नसल्याची प्रतिक्रिया सरनाईक यांनी त्यावेळी दिली होती.
Comments
Loading…