in

कोल्हापुरात ‘स्वाभिमानी’कडून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन

सतेज औधकर, कोल्हापुर | कोल्हापुरात आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. पूरग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या मदतीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला.

राज्य सरकारने पुरग्रस्त शेतकऱ्यांना गुंठ्याला १३५ रूपये प्रमाणे मदत जाहीर केली. ही सरकारने केलेली शेतकऱ्यांची थट्टा असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना सरकारने २०१९ प्रमाणे मदत करू असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कुरूंदवाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला.

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

साताऱ्यात खूनाच्या प्रकरणातील आरोपीला 3 तासांत केले गजाआड

दरडग्रस्तांना अखेर मिळाला निवारा,पहिल्या टप्प्यात आज ६२ घरांचा ताबा