in

Gaja Marane Case | ”आता सापडणार नाही”, जामीन मिळाल्यानंतर संजय काकडेंची प्रतिक्रिया…

कुख्यात गुंड गजा मारणेशी संबंध असल्याच्या आरोपावरुन अटक झालेल्या भाजपच्या माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांची जामिनावर सुटका झाली आहे. या सूटकेनंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिकिया दिली आहे.

कुख्यात गुंड गजा मारणे याची तळोजा कारागृहातून काढलेल्या मिरवणुकीप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर संजय काकडे यांना आज दुपारी कोर्टात हजर केले असता,शिवाजीनगर सत्र न्यायालयानं काकडे यांना 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

कुणी कितीही आपटा संजय काकडे सापडणार नाही अशी प्रतिक्रिया न्यायालयातून जामीन मिळाल्यावर भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी दिलीय. पालिकेच्या निवडणूका डोळ्यासमोर आल्यानं हे राजकारण केलं जात असल्याचा आरोप काकडे यांनी केलाय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जिगरबाज मयूर शेळकेला रेल्वेकडून ५० हजार, तर जावाकडून बाईक

Nashik Oxygen leaked: नाशिक दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन-राजेश टोपे