in

रस्ता खचला अन…

मागील महिन्यात पार्किंमध्ये विहिरीत कार बुडाल्याचा व्हिडीओ आपण पाहिला होता. अशाच प्रकारची घटना दिल्लीतील द्वारका परिसरात घडली आहे. रस्ता अचानक खचल्यानं तयार झालेल्या एका मोठ्या खड्ड्यात कार अडकली. भल्यामोठ्या खड्ड्यानं संपूर्ण कार आपल्यात सामावून घेतल्याचं दृश्य पाहून उपस्थितांना धक्काच बसला.

सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सेक्टर-१८ मध्ये हा प्रकार घडला.दिल्लीत मुसळधार पाऊस झाल्यानं आयटीओ आणि प्रल्हादपूरसह अनेक भागांत पाणी साचलं. त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला. गुरुग्राममधील काही भागांत रस्त्यांवर पाणी तुंबलं होतं.

मुसळधार पावसामुळे द्वारका परिसरातील सेक्टर १८ मध्ये रस्ता अचानक खचला. त्यामुळे एक कार खड्ड्यात कोसळली. ही कार काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही. ही कार एका पोलीस कर्मचाऱ्याची असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. मात्र अद्याप तरी या माहितीला दुजोरा मिळालेला नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसे देऊन माझा वाढदिवस साजरा करा”

“मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय महोत्सवात झळकण्यासाठी पुढाकार घेणार”- अमित देशमुख