in

Watch Video: बदलापुरात सबवेमध्ये साचलेल्या पाण्यात अडकली कार

मयुरेश जाधव | बदलापुरातील रेल्वे रूळाखालच्या सबवेमध्ये साचलेल्या पाण्यात चारचाकी इनोव्हा कार अडकल्याची घटना घडली आहे. अखेर क्रेनच्या साहाय्याने ही गाडी बाहेर ओढून काढण्यात यश आले आहे. मात्र या घटनेने सबवेत दरवर्षी साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे, तसेच पावसाळ्यापुरते सबवे बंद करण्याची मागणी जोर धरतेय.

बदलापुरात बेलवली आणि कात्रप परिसराला जोडणारा रेल्वे रुळाखालचा सबवे दरवर्षी पाण्याखाली जातो. या सबवेमधील पाण्याचा निचरा होत नसल्याने या सबवेत पाणी साचल्याची घटना समोर येते. आज सुद्धा तुफान पावसामुळे सबवे गुडघाभर पाण्याखाली गेला आहे. त्यात या सबवेत चारचाकी इनोव्हा कार अडकल्याची घटना घडली आहे. या पाण्याचा अंदाज न आल्यानं एका इनोव्हा चालकाने त्यात गाडी टाकली आणि सबवेच्या मधोमध अडकून पडला. जवळपास अर्धा तास ही गाडी चालकासह सबवेमध्ये अडकली होती. अखेर चालकाने मदतीसाठी पाचारण केल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने ही गाडी बाहेर ओढून काढण्यात आली.

या घटनेमुळे बदलापुरातील सबवेत दरवर्षी साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. त्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा होऊ शकत नसेल, तर किमान पावसाळ्यापुरते तरी हे सबवेच बंद करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘कोरोनाविरोधातील लढाईत केंद्र सरकार अपयशी’ मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारले

मुख्यमंत्र्यांकडून मुंबईतील परिस्थितीचा आढावा