in

Maharashtra Band | वसईत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीकसह 15 जणांवर गुन्हा

संदीप गायकवाड, वसई-विरार | राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर वसईत राष्ट्रवादीचे कॉंग्रेसने आक्रमक पावित्रा घेत दमदाटी करून दुकाने बंद करायला लावली. याप्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीकसह 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्या प्रकरणात राज्यात महाविकास आघाडी सरकारने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला वसई-विरार नालासोपाऱ्यात दिवसभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. यावेळी वसईत राष्ट्रवादीचे कॉंग्रेसने आक्रमक पावित्रा घेत दमदाटी करून दुकाने बंद करणे, वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीकसह 15 जणांवर भादवी 188, मुंबई पोलीस अॅक्ट 137 (1), 135 प्रमाणे माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आहेर यांनी ही माहिती दिली.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘माझा अजित जितका तापट तितकाच प्रेमळ ही’!,आईने केलं अजित दादांच तोंडभरून कौतुक

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान; आ.आशुतोष काळेंची सुप्रीम कोर्टात धाव