in

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करणार

परप्रांतियांच्या नोंदणीवरुन भाजप आमदार अतुल भातखळकर आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात 153 अ अन्व्ये गुन्हा दाखल करणार आहेत.मुंबईतील समतानगर पोलीस ठाण्यात मुख्यमंत्र्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं भातखळकर म्हणाले.

शिवसेना मतदानाच्या वेळी परप्रातियांच्या मतांसाठी ‘बाटी चोखा’, ‘केम छो वरळी’ असे विविध कार्यक्रम आयोजित करते, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली. परप्रातियांच्या नोंदणीवरुन अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न असल्याचा दावा करत अतुल भातखळकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी एक व्हिडीओ प्रसारीत करुन म्हटलं आहे. मुंबईतील समतानगर पोलीस ठाण्यात मुख्यमंत्र्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं भातखळकर म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बलात्काराच्या घटनेने पुन्हा मुंबई हादरलं; 7 वर्षांच्या मुलीसोबत दुष्कर्म

pimpri chinchwad