राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी टि्वटरवर आक्षेपार्ह मजकूर लिहून शेअर केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. बारामती तालुका पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी @वेदश्री_19 या टि्वटर वापरकर्त्यावर आणि राजे हर्षवर्धन या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
अभिजीत जाधव आणि अजित कदम हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली होती. अजित कदम हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचं काम सांभाळत असतात. टि्वटरवर अजित कदम यांना पवारांसंदर्भात आक्षेपार्ह टि्वट दिसलं. यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली.
दरम्यान, या टि्वटचा स्क्रीनशॉटचा पुरावा सादर करत उपनगराध्यक्ष अभिजित जाधव यांनी पोलिसात तक्रार दिली. देशात राजकीय तेढ, शत्रुत्व आणि द्वेषाची भावना निर्माण करून शरद पवार यांची बदनामी करण्याच्या उद्देशानं टि्वटरवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Comments
Loading…