पश्चिम बंगालमधील कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आज मुंबईत काही ठिकाणी ठापेमारी केली. या प्रकरणाशी संबंधित सेबी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर छापे टाकले.
शारदा कंपनीची स्थापना जुलै 2008मध्ये झाली. या कंपनीत सर्वसामान्य नागरिकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र लोकांना परतावा न मिळाल्याने 16 एप्रिल 2013 रोजी शारदा ग्रुपच्या विरोधात पहिला गुन्हा नोंदवला गेला. यानंतर फरार झालेला कंपनीचा मालक सुदिप्तो सेनला काश्मीरमध्ये अटक करण्यात आली. तर, 2014ला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या घोटाळ्याचा तपास सीबीआयला सोपविण्यात आला.
कोलकाता येथील सेबीच्या कार्यालयात 2009 ते 2013 या कालावधित नेमणूक असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवासस्थाने तसेच कार्यालय परिसरात सीबीआयने छापे टाकले. एकूण सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
Comments
Loading…