राज्यात वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बंध मंगळवारी (५ एप्रिल) रात्रीपासून लागू झाले असून, ३० एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी होणार आहे. याचदरम्यान, .डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले आहे.
दरवर्षी १४ एप्रिलला बाबासाहेबांची जयंती साजरी होते. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने सार्वजनिक पद्धतीने जयंती साजरी करण्यावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे शासनाच्या नियमावलीनुसार बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करून माहिती दिली.
Comments
Loading…