in

“केंद्र सरकारला सामान्य लोकांच्या प्रश्नांसंबंधी आस्था नाही”, शरद पवार

राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी शरद पवार म्हणाले की, “सामान्य लोकांचे प्रश्न वाढत आहेत आणि केंद्रातील सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे. त्यांना त्या प्रश्नांसंबंधी आस्था नाही. आपण बघतो आहोत, साधारण दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती काहीना काही वाढताना दिसत आहेत, असे कधी घडले नव्हते.”

पण काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्या तरी केंद्राने आपल्या देशात किमती कमी केल्या नाहीत. इतर देशात मात्र किंमती कमी होता आहेत. केंद्राने या दरवाढीतून उत्पन्न वाढविण्याचे स्रोत निर्माण केले आहे. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सलग दहा दिवस पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली तेव्हा भाजपने ओरड सुरू केली होती. पण आज मात्र ते गप्प आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“बायकोच्या नावाने 19 बंगल्याचे घोटाळे करत आहेत” किरीट सोमय्यांचा ठाकरेंना टोला

अमरावतीत वीज पडून शेतकरी मजुराचा मृत्यू