in

Covid Vaccination : ७४ कोटी डोससाठी केंद्रानं दिली ऑर्डर

देशातील संपूर्ण कोरोना लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने स्वत:कडे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या मोहिमेसाठी तब्बल ५० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठी सरकारकडे पुरेसा निधी असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, केंद्राने या मोहिमेसाठी ७४ कोटी डोससाठी विविध कंपन्यांना ऑर्डर्स दिल्याची माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोना लसीकरण मोहिमेत १८ वर्षांवरील सर्वांचेच लसीकरण केंद्र सरकार करणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सोमवारी जाहीर केले होते. या मोहिमेबाबत अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी माहिती दिली.

सरकारकडे लसीकरणासाठी पुरेसा निधी असून, तत्काळ कुठल्याही पुरवणी निधीची गरज नसल्याचे सूत्रांनी सांगितले. कदाचित दुसऱ्या टप्प्यात संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुमारास गरज भासू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.

लसीकरण मोहीम सीरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक आणि बायो-ई या कंपन्यांवर केंद्रित असून, बहुतांश लोकसंख्येला त्यातून लसी देता येतील, अशी अपेक्षा सूत्रांनी वर्तविली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जातवैधता प्रमाणपत्र प्रकरण : खासदार नवनीत राणांना २ लाखांचा दंड

‘सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो’