in

किराणा दुकान आणि फार्मसी स्टोअरीवरील निर्बंध हटवण्याचे केंद्र सरकारचे आदेश

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कलम १४४ लागू केला आहे. अशा वेळी अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठ्यांची कमतरता भासू नये यासाठी किराणा दुकान, केमिस्ट, फार्मासिस्ट , किराणा गोदामांनावरील कलम १४४ निर्बंध हटवण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. कित्येक राज्यांनी शनिवार आणि रविवारी रात्री विकेंड कर्फ्यू जाहीर केला आहे, तर महाराष्ट्र सरकारने राज्यव्यापी कर्फ्यू लागू केला आहे. परंतु या निर्बंधांतून प्रत्येक राज्यांनी किराणा दुकान, आणि फार्मसी स्टोअरला हटवावे असे केंद्रीय मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी याबाबत राज्यांना पत्र लिहिले आहे.

केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने अन्न व ग्राहकविषयक बाबींसाठी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. या पत्रात राज्यांनी अत्यावश्यक वस्तूंच्या किंमती वाढवू नयेत आणि नागरिकांना स्वस्त किंमतींमध्ये वस्तू उपलब्ध होतील याची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. तसेच कच्चा मालाच्या किंमती आणि वस्तूची विक्री किंमतींमधील चढउतार यावर लक्ष केंद्रीत करा, असे नमुद करण्यात आले आहे.

मागणीनुसार पुरवठा होण्यासाठी, वस्तुंची साठेबाजी रोखण्यासाठी तसेच जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने होणारी विक्री रोखण्यासाठी प्रत्येत राज्याने जिल्हा पातळीवर अन्न व नागरी पुरवठा, अन्न सुरक्षा नियंत्रक आणि पोलिसांची संयुक्त पथके तयार केली जाऊ शकतात, असे ते म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बळीराजासाठी यंदा पाऊस सुखावणारा

Gold Price Today| पाहा सोन्याचे आजचे दर