देशासह राज्यभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. अशा वेळी महाराष्ट्रात देखील कोरोनाचा उद्रेक कायम आहे. देशभरात सर्वाधिक १० कोरोनाबाधित जिल्ह्यांपैकी सात जिल्हे हे महाराष्ट्रात आहेत. यामुळे चिंतेत भर पडली आहे.
दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत असल्याने राज्यात तज्ज्ञांची ५० पथके तैनात करण्यात आली आहेत. यामार्फत राज्यभरातील विविध शहरांच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. यात महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी ५८ टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहे. तर मृत्यूचीही संख्याही मोठी आहे.
केंद्रीय आरोग्य सचिन राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत देशातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. “देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या पहिल्य दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांचा समावेश आहे. एक जिल्हा कर्नाटकातील आहे. तर छत्तीसगढ आणि दिल्लीतीलही एका जिल्ह्याचा टॉप टेनमध्ये समावेश आहे, अशी माहिती भूषण यांनी दिली
Comments
Loading…