in

रेमडेसिवीरबाबत केंद्र सरकारनं घेतला ‘हा’ निर्णय

कोरोना संकटात सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता आहे. अशातच इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. देशात दररोज कोरोनाबाधितांचा नवनवा उच्चांक स्थापन होत असताना केंद्र सरकारने कोरोनावर प्रभावी ठरत असलेल्या रेमडेसिविर या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यासंदर्भातील एक पत्रक रविवारी केंद्र सरकारद्वारा जारी करण्यात आले.

देशात सक्रिय रुग्णांची संख्या ११ लाखांहून अधिक झाली आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत अचानक वाढ झाली. येत्या काही दिवसांत मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रेमडेसिविर इंजेक्शन आणि रेमडेसिविर ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडिएंट्स (एपीआय) यांच्या निर्यातीवर बंदी घालण्यात येत आहे, असे केंद्र सरकारद्वारा जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. औषध निरीक्षकांना रेमडेसिविरच्या साठ्यांवर तसेच त्याच्या विक्रीच्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

साप्ताहिक राशीभविष्य; गुढीपाडव्याच्या या आठवड्यातील विविध योग आणि राशी बद्दल परिणाम जाणून घ्या

WHO प्रमुखांनी लस वितरणाबाबत व्यक्त केली ‘ही’ चिंता