राज्यात आज वीकएन्ड लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये सोमवार ते शुक्रवार निर्बंध कडक असतील, तर शनिवारी आणि रविवारी संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतल्यानंतर लवकरच राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
राज्य सरकारच्या निर्णयानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला सहकार्य करणार असल्याचे सांगितले. मात्र, गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेची होणारी हेळसांड पाहता लवकच आर्थिक पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी त्यांनी केली.
Comments
Loading…