in

मला ‘चंपा’ म्हणणं थांबवा, अन्यथा…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर येथील प्रचारसभेत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख पुन्हा एकदा चंपा असा केल्याने चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त करत अजित पवारांना इशारा दिला आहे.

खूप दिवस मला चंपा म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असं सांगितलं होतं. आता हे थांबलं नाही तर त्यांचीसुद्धा जी शॉर्ट फॉर्म आहेत.त्यांच्या मुलापासून सर्वांची शॉर्ट फॉर्म मला करावी लागतील,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

जरी शरद पवार यांच्यावरील पीएचडी अजून पूर्ण झाली नसली, तरी आता मी अजित पवार यांच्यावरही एम फील करायचा निर्णय घेतला आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. राज्यात साखर कारखाने आजारी झाले की, ते विकत घ्यायचा सपाट पवार कुटुंब करीत असून आता त्यांनी आपल्या कडील कारखान्यांच्या माहितीची श्वेतपत्रिका काढा, असं म्हणत निशाणाही साधला आहे.

“अजित पवारांना राज्यात करोनाचं संकट भीषण झालेलं असतानाही दोनदा येऊन राजकीयदृष्ट्या फार महत्व नसलेल्या लोकांच्या घरी जावं लागतं. हा त्यांचा स्वभाव नाही, तो शरद पवारांचा स्वभाव आहे. निवडणूक त्यांच्या हातून गेल्याचं हे लक्षण आहे. ज्याप्रकारे ते बोलत आहेत त्यावरुन पायाखालची जमीन सरकली आहे असं दिसत आहे. पायाखालची जमीन सरकली ही जिभेवरचा ताबा सुटतो. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढ्याची निवडणूक भाजपा जिंकणार हे स्पष्ट आहे,” असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘लस उत्सव’ हे तर नुसतं ढोंग म्हणतं राहुल गांधींचा हल्लाबोल

Virat Kohli : विराट कोहलीला राग अनावर; विकेट गेल्यावर बॅटने खुर्ची उडवली