परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. सिंग यांनी पत्रात गृहमंत्री अनिल देशमुखांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवत आहेत, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
‘गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घ्यायला हवा. उद्धवजी, आमचा विषय नाही. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला संपवायला निघाले आहेत, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप लगावले आहेत. ते अतिशय निंदनीय आहेत. आता स्पष्ट झालं आहे की ठाकरे सरकार भ्रष्ट आहे. त्यामुळे केवळ अनिल देशमुखांचीच नव्हे तर संपूर्ण ठाकरे सरकारनं सत्तेतून पायउतार व्हावं. महाराष्ट्राच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालं आहे, हे ठाकरे सरकारनं पदोपदी सिद्ध केलं आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
Comments
Loading…