in

‘शरद पवार केंद्राची ऑफर न स्वीकारण्याइतके कच्च्या गुरुचे चेले नाहीत’

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कोल इंडियाच देशातील वीज प्रकल्पांतील कोळसा टंचाईला आणि पर्यायाने वीजटंचाईला जबाबदार आहे आणि या विषयावर भाजपाचे नेते देशाची दिशाभूल करत असल्याचे स्पष्ट होते, अशा शब्दांत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर हल्ला चढवला. तसेच राज्यात भारनियमन होऊ नये यासाठी वीज उत्पादन वाढविण्यासाठी नियोजन केले जात आहे, अशी ग्वाही ऊर्जामंत्र्यांनी दिली. त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे.

“केंद्राने कोळसा दिला नाही म्हणून वीज कमी निर्माण होणार आहे असे म्हणत आहेत. पण हे सांगणार नाही की, केंद्राने आग्रह धरला होता की पावसामुळे कोळसा कमी मिळेल. वेळीच साठा करा पण तो आम्ही केला नाही हे सरकार सांगणार नाही. तसे नाचता येईना अंगण वाकडे. शरद पवारांना केंद्राने तुम्ही आमच्याबरोबर सरकार बनवा अशी ऑफर दिली होती तर न स्विकारण्याइतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. केंद्रामध्ये सरकार असणाऱ्या पक्षासोबत महाराष्ट्रामध्ये सरकार आणण्याला त्यांनी प्राधान्य दिले असते. त्यामुळे आता सर्वसामान्य माणसांना हे काय म्हणतात आणि त्याचा काय अर्थ होतो हे नीट कळतं,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लखीमपूर खेरी प्रकरणी काँग्रेस आक्रमक; राष्ट्रपतींना भेटून केली ‘ही’ मागणी!

अक्षय कुमारने पूर्ण केले ‘रक्षाबंधन’ चित्रपटाचे चित्रीकरण