in

“जो कोणी आंदोलन करेल त्याला आमचा पाठिंबा असेल”

आज शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा भाजपचा असल्याचा आरोप  सत्ताधारी नेत्यांकडून केला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर भाष्य केलं आहे. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जो कोणी मोर्चा, आंदोलन करेल त्याला आमचा पाठिंबा असेल. शरद पवार यांनी जरी मोर्चा काढला तरी आमचा त्यांना पाठिंबा राहिल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“मी याआधी देखील मांडणी केली आहे. केवळ बीड पुरतं नाही…केवळ विनायक मेटे यांच्या पुरतं नाही, तर जे जे मराठा समाजाला आरक्षण लवकर मिळावं यासाठी रस्त्यावर उतरतील…मग पवार साहेब जरी रस्त्यावर उतरले तर त्यांच्यामागे झेंडा न घेता…बिल्ला न लावता, गळ्यात भाजपचा गमछा न घालता आम्ही पवार साहेबांच्या मागे उभे राहू,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.  

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Monsoon Updates | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून महाराष्ट्रात दाखल

BMC Unlock | मुंबई मनपाचे परिपत्रक जारी… ‘अनलॉक’साठी महत्वाचे नियम