in

चंद्रपुरात भुकबळी : निराधार मायलेकींचा अन्न न मिळाल्यानं तडफडून मृत्यू

चंद्रपुरात मागील महिन्याभरापासून अन्न व पाण्यावाचून मायलेकीचा राहत्या घरात तडफडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक व तितकीच समाजमन व मानवी मनाला सुन्न करणारी घटना जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील कोठारी गावात उजेडात आली. झेलबाई पोचू चौधरी(७३) व तिची मुलगी माया मारोती पुलगमकर (४५)अशी मृतांची नावं आहेत. त्यांच्या मृत्युच्या बातमीने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कोठारी गावातील एका घरात ७३ वर्षीय झेलाबाई पोचू चौधरी व तिची मुलगी माया मारोती पूलगमकर अनेक वर्षांपासून राहतात. त्या निराधार होत्या. त्यांना मागेपुढे कुणीही नसल्याने त्या एकमेकींच्या आधाराने जगत होत्या. गावात मागून वा कुणी दिलेल्या अन्नावर भूक भागवित होत्या. सकाळी व संध्याकाळी गावात फिरत दिसणाऱ्या मायलेकी मागील महिनाभरापासून अचानक दिसेनाशा झाल्या होत्या. त्या आजाराने ग्रस्त व शरिराने अशक्त असल्याने बाहेर चालणे, फिरणे शक्य होत नसल्याने त्या घरातच पडून राहत होत्या. शेजाऱ्यांनीही कधी त्यांची विचारपूस केली नाही. अशात अन्न व पाणी मिळाले नसल्याने त्या घरातच मृत्यू पावल्या होत्या. त्यांच्या घराचे दार उघडेच होते व गावातील मोकाट कुत्रे घरात शिरून त्यांचे अंगावरील कपडे ओढल्याने त्यांचा मृतदेह नग्नावस्थेत व शरिराचे लचकेही तोडल्याचे दिसून आले. त्या मायलेकीचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी व मानवी मनाला सुन्न करून थरकाप उडविणारा होता. शेजारी त्यांचे उघड्या घराकडे डोकावून पाहिल्यानंतर त्यास मायलेकींचा मृत्यू झाल्याचे व शरीर अत्यंत गंभीर अवस्थेत दिसून आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार तुषार चव्हाण व त्यांचे सहकारी पोलीस तातडीने घटनास्थळावर पोहचून नग्न शरीरावर कपडे टाकून प्रेत ताब्यात घेतले व तपासणीसाठी बल्लारपूरला रवाना केले.

गावकऱ्यांनी केले अंत्यसंस्कार –
मायलेकीच्या मृतदेहाचा अंतिम संस्कारासाठी गावकऱ्यांनी निधी गोळा केला. गावातील सामाजिक कार्य करणारे युवक, नातेवाईक खांदेकरी बनले. अंतिम यात्रेत गावातील महिला, पुरुषांनी अत्यंत वेदनादायी मनाने सहभागी झाल्या.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अंबरनाथ

Virar