in

शिवयरांच्या मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बड्या राजकीय नेत्यांवर गुन्हा दाखल

गजानन वाणी , हिंगोली | हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बुधवारी 13 ऑक्टोबरला दाखल झाला. यानिमित्ताने महाराजांचे शिवप्रेमींच्यावतीने ढोल ताशे वाजवत जंगी स्वागत करण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकारी व आपत्ती व्यस्थाप यांच्या आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी शिवसेना खासदार हेमंत पाटील,राष्ट्रवादी चे आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे,शिवसेनेचे माजी सहकार मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, स्थानिकचे भाजपचे पद अधिकारी व पुतळा समिती सदस्यांसह 400 ते 500 जणांवर वसमत शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसमत शहरात13 ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या वेळी सगळ्याचं बड्या पक्ष्याची पदाधिकारी नेते मांडळी मिरवणुकीत हजर होती. या वेळी अतिउत्साहच्या भरात राष्ट्रवादी आमदार चंद्रकांत नवघरे आणि शिवसेनेचे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी घोड्यावर चढून हार घातला. मात्र या घटनेनंतर आमदार चंद्रकांत नवघरे यांना जाहीर माफी मागावी लागली. शिवसेनेचे माजी मंत्री महोदय यांनी अजूनही या संदर्भात माफी मागतली नसल्यामुळे अनेकांडून शिवसेनेच्या माजी मंत्र्यावर टीकेचे आरसोड ओढले जात आहेत. त्यामुळं आत्ता शिवसेनेचे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा कधी माफीनामा पेश करणार असा सवाल विचारला जातो.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

प्रदुषण थांबलं नाही तर मुंबईसह ५० शहरं पाण्याखाली जाणार!

ITने महाराष्ट्रात टाकलेल्या छाप्यांमध्ये कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न आणले उघडकीस