in

Maratha Reservation; ”माझं तुझं केलं तर बघाच”, छत्रपती संभाजीराजेंचा इशारा

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर केंद्र विरुद्ध राज्यात आरोपप्रत्यारोपाच्या फैरी सुरु असताना आता छत्रपती संभाजीराजे यांनी आपली भूमिका मांडली आहे. मुंबईत मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांशीही चर्चा करून मी माझी भूमिका मांडणार आहे. समाजाची भावना मांडल्यानंतर माझं तुझं केलं तर बघा,” असा इशाराच संभाजीराजेंनी सर्व आमदार आणि खासदारांना दिला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या मराठा आरक्षणावरील निकालानंतर केंद्र व राज्यात शाब्दिक युद्ध रंगले असताना छत्रपती संभाजी राजे काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी या मुद्यावर आपले मौन सोडले. सुप्रीम कोर्टाचा निकालानंतर राज्य आणि केंद्रात आरोप प्रत्योराप सुरु असून एकमेकांवर जबाबदारी झटकत आहेत. कोणी ही राज्याची जबाबदारी तर कोणी केंद्राची जबाबदारी असल्याचं म्हणत आहे. मराठा समाजाला याच्याशी काही देणं घेणं नसून तुम्ही मार्ग काय काढून देणार आहात ते सांगा,” अशी विचारणा छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी केली.भाजपाने मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घ्यावी, मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये असे आवाहन करत असताना त्यांनी ‘मी काही ठेका घेतलेला नाही’ असा संताप व्यक्त केला. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सत्ताधारी – विरोधकांशी चर्चा करणार

“माझ्याकडे अनुभव असला तरी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले अनेकजण आहेत. त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. महाराष्ट्र फिरुन पुन्हा एकदा भावना समजून घेणार आहे. येत्या २७ तारखेला मुंबईत मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांशीही चर्चा करणार आहे. या चर्चेनंतर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मी माझी भूमिका मांडणार. पण यानिमित्ताने मला सर्व आमदार आणि खासदारांना सांगायचं आहे की, समाजाची भावना मांडल्यानंतर माझं तुझं केलं तर बघा,” असा इशाराच संभाजीराजेंनी दिला आहे.

मला आंदोलन शिकवू नये

छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून मला कोणी आंदोलन कसं करायचं हे शिकवण्याची गरज नाही. मी जे बोलतो ते करुन दाखवतो. २००७ पासून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. एवढा मोठा अलिशान वाडा असतानाही महिन्यातील चारच दिवस तिथे राहतो. समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी, दिशा देण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. म्हणून मला कोणी शिकवण्याची गरज नाही,” असा टोलाही त्यांनी टीकाकारांना लगावला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘भाजपामध्ये मोदींना हटवून गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा’

कोरोनाच्या लढाईत ‘ड्रीम गर्ल’ मैदानात ; रूग्णांसाठी केली मोठी मदत