in

RippedJeansTweet | फाटलेल्या जीन्स प्रकरणावरून मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचा माफीनामा

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह यांचे महिलांविरोधातील वादग्रस्त वक्तव्य देशभरात गाजत आहे. रावय यांनी ‘फाटलेली जीन्स घालणारी महिला कोणत्या संस्कृतीचा प्रसार करते’ असे वादग्रस्त विधान केले होते. यावरुन सर्वच स्तरांतून टीका होत आहे. दरम्यान मुख्यमंत्री रावत यांनी केलेल्या फाटलेल्या जीन्स विधानावर जाहीर माफी मागितली आहे.

रावत यांच्या पोषाखावरील वादग्रस्त वक्तव्यावरून सोशल मीडियावरुन अनेक राजकीय महिलांपासून ते बॉलीवूडपर्यंत अनेकांनी टीका करण्यास सुरु केले होते. या प्रकरणावरून काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी वडेरा, खासदार, शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी, खासदार जया बच्चन तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, शिवसेना नेता उर्मिला मातोंडकर, यांनी रावत यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. तसेच मुख्यमंत्री रावत यांना मुख्यमंत्री पदावरून हटवा अशी मागणी विरोधकांनी केली. यामुळे रावत यांच्या विधानावरून राजकारण चांगले तापले आहे. यानंतर रावत यांनी आपल्या वादग्रस्त विधानावरुन माफी मागत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

माफी मागत तीरथ सिंह रावत म्हणाले की, माझा महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही, पण नवीन जीन्स घेऊन कैचीने फाडलेल्या जीन्स वापरण्याला विरोध आहे. परंतु ज्यांना वाटते फाटलेली जीन्स घालावी तराही माझा काही विरोध नाही. माझ्या विधानावरून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुण्यात विद्यार्थ्यांना पोषण आहारा ऐवजी पशु खाद्य; महापौराकडून चौकशीचे आदेश

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर नाशकात अंशत लॉकडाऊन