in

china Flood | चीनमध्ये अतिवृष्टीचा कहर

भारताबरोबरच चीनमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. गेल्या ६० वर्षांच्या तुलनेत यंदा विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. चीन मधील झेंग्झो शहरात वर्षभरात ६४०.८ मिमी पाऊस पडतो. मात्र यंदा एका दिवसात ६१७.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे झेंग्झो शहर पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. सोशल मिडीयावर या संबधी व्हिडीओ वायरल होत आहेत.

चीनमध्ये आतापर्यंत दोन लाख नागरिकांना सुरक्षित हलवण्यात आलं आहे. तर या पूरामध्ये २५ जणांचा यात मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे चार ते पाच फुटापर्यंत पाणी रस्त्यावर भरलं आहे. तसेट पावसामुळे वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. रुग्णालयातील वीज गेल्याने त्याचा फटका रुग्णांना बसला आहे. त्याचबरोबर कोरोना काळातील आरोग्य व्यवस्थेवरही याचा परिणाम झाला आहे.

“जगभरात नैसर्गिक आपत्तीचा परिणाम जाणवत आहे. चीनमधील झेंग्झो शहरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. आठ महिन्यांचा पाऊस एका दिवसात पडला आहे”,असं ट्वीट यूएन क्लायमेट चेंज या अधिकृत ट्विटर खात्यावरून करण्यात आलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाबळेश्वरमध्ये जनजीवन विस्कळीत…

‘नाटकांसाठी रस्त्यावर उतरून नाट्यआंदोलन करायची वेळ आणू नका’ रंगकर्मींचा इशारा…