in

CHIPI AIRPORT : दक्षिणेकडील राज्यांशी कनेक्टिव्हीटी वाढणार

स्थानिकांना रोजगाराची आशा

नागरी उड्डयन महासंचालनालयाने (DGCA) सिंधुदुर्ग विमानतळाला एरोड्रोम परवाना दिल्याने विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज 9 ऑक्टोबर रोजी विमानतळाचे उद्घाटन करतील.

रोजगारासाठी मुंबई-पुण्यात स्थलांतर करत असलेल्या इथल्या स्थानिकांना चिपी विमानतळ स्थानिकांसाठी रोजगार मिळवून देईल, अशी आशा आहे.

ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली, देवबाग आणि चिवळाचे सुंदर समुद्र किनारे अशा एक न अनेक पर्यटन स्थळां या परीसरात आहेत. हे विमानतळ गोव्याच्या सीमेला लागून वेंगुर्ला तहसील अंतर्गत येते. चिपी विमानतळ उभारण्यासाठी साधारण 8 कोटी खर्च झाले. दक्षिण कोकण विभागात येणाऱ्या या विमानतळाचा उद्देश पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांशी हवाई संपर्क वाढवणे आहे.

विमानतळ अधिकाऱ्यांनुसार चिपी विमानतळाची 2,500 मीटर लांबीचा धावपट्टी 200 निर्गमन आणि 200 आगमन होणाऱ्या प्रवाशांना पीक अवर्समध्ये हाताळू शकते. तसेच A -320 आणि B-737 प्रकारच्या विमानांसाठीही उपयुक्त आहे. उडाण योजनेअंतर्गत सरकार येथे उड्डाण परिचालन सुरू करण्याचा विचार करत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उद्धव ठाकरेंच्या उजव्या बाजूला राणे तर डावीकडे अजित पवारांची खूर्ची

अफगाणिस्तानातील मशिदीत भीषण स्फोट; 100 जणांचा मृत्यू