in

Chipi Airport: चिपी विमानतळाची निमंत्रण पत्रिका आली समोर…,नारायण राणेंचे नाव

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याची निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध झाली आहे. या निमंत्रण पत्रिकेत केंद्रीय लघू, सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांना नेमके कितवे स्थान देण्यात आले ? त्यांना निमंत्रण पत्रिकेत स्थान देण्यात येणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत होता.मात्र आता निमंत्रण पत्रिका समोर आल्याने हा प्रश्न सुटला आहे.

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा विकास कोणी केला यावरून नारायण राणे आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये श्रेयवाद सुरु होता. यानंतर उद्धव ठाकरेंना उद्घाटनाला बोलविणार की नाही यावरून देखील मध्यंतरी वाद रंगला होता. निमंत्रण पत्रिकेत कोणाचे नाव असणार आणि कोणाचे नसणार यावरून राणेपूत्र आणि शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, खासदार राऊत यांच्यात जुंपली होती. आज अखेर चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याची पत्रिका जाहीर झाली आहे.

येत्या 9 ऑक्टोबरला दुपारी १ वाजता हा लोकार्पण सोहळा होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर पहिले आहे. ठाकरेंच्या हस्तेच लोकार्पण केले जाणार आहे. तर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिंदे हे या सोहळ्याचे अध्यक्ष असतील. तर केंद्रीय लघू, सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंह व राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव आहे.

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नवरात्री उपवासासाठी भगर खाल्ल्याने एकाच कुटूंबातील ६ जणांना विषबाधा

चिपी विमानतळाचे उद्घाटन लपून-छपून नको,भाजपचा चिमटा