in ,

‘रावणाला मदत करणारी शूर्पणखा नको’; वाघ यांचा चाकणकरांना टोला

राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या नावाची या पदासाठी चर्चा होऊ लागली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून यासंदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र, अधिकृत सुत्रांच्या माहितीनुसार रुपाली चाकणकर यांचं नाव निश्चित झालं असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे. चाकणकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी चित्रा वाघ यांनी मविआ सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला आहे.

चित्रा वाघ यांचं टि्वट –

‘महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल” असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मनमोहन सिंग रुग्णालयात दाखल; पंतप्रधान मोदींनी केलं टि्वट

मैं अपने दुशमनों का बड़ा एहतराम करता हूँ; नवाब मलिक यांचं ट्विट