in

खून का बदला खून से ! जामिनावर बाहेर येताच आरोपीवर चॉपरने हल्ला

मंगेश जोशी , प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळाल्यानंतर विरुद्ध बाजूच्या टोळक्‍याने नशिराबाद जवळ गोळीबार आणि चॉपर हल्ला केल्याने एक जण ठार झाला असून एक जखमी झाला आहे . शहरात घडलेल्या यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालेली आहे.

या हल्ल्यात एक जण ठार झाला आहे, तर एक गंभीर जखमी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील नशिराबादजवळ ही घटना घडली आहे. भुसावळ येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळाल्यानंतर विरुद्ध बाजूच्या टोळक्‍याने आज नशिराबादजवळ गोळीबार आणि चॉपर हल्ला केला.

धम्माप्रिय मनोहर सुरळकर असे घटनेत ठार झालेल्या मुलाचे नाव असून गंभीर जखमी असलेले मनोहर सुरळकर यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

भुसावळ येथे 11 ऑक्टोंबर 2020 रोजी झालेल्या खून प्रकरणी संशयित धम्मा प्रिय मनोहर सुरळकर यास पोलिसांनी ताब्यात घेत त्याची रवानगी जळगाव जिल्हा कारागृहात करण्यात आली होती दरम्यान मंगळवारी त्यास जामीन मिळाल्याने त्याचे वडील मनोहर आत्माराम सुरळकर मुलास घेण्यासाठी जळगाव येथे आले होते. जामीनाची प्रक्रिया पार पाडून जळगाव कडून भुसावळ कडे दुचाकी वर जाताना नशिराबाद जवळ अज्ञातांनी पिता पुत्रावर गोळीबार करत धारदार शस्त्राने हल्ला चढवला.

सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे त्यांनी घटनास्थळी धाव घेतली .

What do you think?

-6 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gondia Crime | कुटुंबातील तिघांची हत्या करुन स्वत:लाही संपवलं

Maharashtra Corona Update | राज्यात 3,131 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद