in ,

Citi Bank | चार हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार; सिटी बँक भारतातून गाशा गुंडाळणार

अमेरिकेची बँकींग साखळी असलेल्या सिटी बॅंकेने भारतातील ग्राहक बँकिंग व्यवसायाचा गाशा गुंडाळण्याचे निश्चित केले आहे. कंपनीच्या धोरणांचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गुरुवारी यासंबंधी निर्णय जाहीर करण्यात आला.

भारतातील सिटीबँकेच्या बँकिंग व्यवसायांतर्गत क्रेडिट कार्ड, रिटेल बँकिंग, गृहकर्ज वितरण आणि संपत्ती व्यवस्थापन हे व्यवसाय सध्या कार्यरत आहेत.

भारतामध्ये सिटीबँकेच्या ३५ शाखा कार्यरत असून या शाखांमध्ये चार हजार कर्मचारी कार्यरत आहेत. गुरुवारी भारतासह १३ देशांतील बँकिंग व्यवसाय बंद करण्याचा निर्णय बँकेचे जागतिक सीईओ जेन फ्रेझर यांनी जाहीर केला. मात्र या सर्व प्रदेशांतील बँकिंग व्यवसाय किती टप्प्यांत बंद केले जातील, त्याचा तपशील अद्याप हाती आलेला नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आमदार निधीतून कोरोना खर्चासाठी 350 कोटी निधी देणार- अजित पवार

CSK vs PBKS : चेन्नईसमोर 107 धावांचे आव्हान