in ,

पूँछमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक, 5 भारतीय जवान शहीद

जम्मू- काश्मीरमधील (Jammu Kashmir Encounter) पूँछ जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवादी (Terrorist Attack)मोठी चकमक झाली आहे. या चकमकीत जेसीओसह पाच जवान शहीद झालेत. जम्मू -काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यातील डेरा की गली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जेसीओसह पाच जवान शहीद झाले.

जवळपास 4 दहशतवाद्यांनी सीमा पार करुन पूँछला जिल्ह्यात घुसखोरी केली होती. त्यानंतर हे दहशतवादी काश्मीर खोऱ्याच्या दिशेनं रवाना झाले. भारतीय सुरक्षा दलानं मुगल रोडजवळील डेरा की गली परिसरात या चार दहशतवाद्यांना घेरलं, त्यानंतर भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरु झाला. या चकमकीत पाच सैनिक गंभीररित्या जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मात्र त्याआधीच पाचही जवानांचा मृत्यू झाला. अनिल देशमुख यांच्या मुलाला होणार अटक? CBI चं पथक घरी पोहोचलं अजूनही परिसरात चकमक सुरु असल्याचं वृत्त आहे. यासह सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून सर्च ऑपरेशन सुरु आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Happy Birthday Amitabh Bacchan यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आमदार संदीप क्षीरसागरांची बुलेट रॅली