in

चिपळूणमध्ये ढगफुटी; मुंबई – गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प

चिपळूणमध्ये पुराची भीषण परिस्थिती ओढवली असून संपूर्ण चिपळूण शहर, खेरडी, कंबसते परिसर पाण्याखाली गेले आहे. सन 2005 नंतर आलेला हा भीषण पूर असून त्याची भीषणता 2005 पेक्षाही जास्त असल्याचे म्हटले जात आहे. पाणी सातत्याने वाढतच असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण जलमय बनले असून भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहर जलमय झाले असून 2005 ची पुनरावृत्ती असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चिपळूण शहरातील बाजारपेठ , खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे . याशिवाय शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

मुंबई – गोवा महामार्ग , कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे . अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत.

वाशिष्टी शिवनदीला पूर आल्याने चिपळूण शहरातील जुना बाजार पूल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेले असून दिसेनासे झाले आहेत . रात्रभर ढगफुटीसारखा पडलेला पाऊस आणि कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस यामुळे शहरात पाणी आले आहे . वाशिष्टी , शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे .

सकाळी 9 वाजण्याच्या दरम्याने शहरातील जुना बाजार पूल , बाजारपेठ , जुने बस स्टॅन्ड , चिंचनाका मार्कंडी , बेंदर्कर आळी , मुरादपूर रोड , एसटी स्टँड , भोगाळे , परशूराम नगर परिसरात पाणी वाढत आहे. रॉयल नगर तसेच राधाकृष्ण नगरमधील घरांमध्ये पाणी शिरले असून अनेकांच्या चारचाकी व दुचाकी पाण्याखाली आहेत . याशिवाय अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . तर अनेक जण घरात अडकले आहेत . पहाटे चार वाजल्यापासून शहरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरू लागले . शहरालगतच्या खेर्डीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून अनेक घरे पाण्याखाली आहेत. बाजारपेठेत कमरेपर्यंत पाणी आहे. याशिवाय पावसाचा जोर वाढत असून पाणी पातळीत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शेतातील माल बाजारात पोहोचविण्यासाठी रस्ते योजना

कोल्हापुरात पावसाचं थैमान; NDRFची टीम रवाना