in

मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबईत मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूंबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील, असे त्यांनी जाहीर केले आहे.

मुंबईत शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. शहरातल्या विविध भागांत पावसाने रौद्ररुप दाखवलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका आयुक्तांकडून बचाव कार्याची माहिती घेतली. एनडीआरएफ, महानगरपालिका, अग्निशामक दल आणि पोलीस यांनी समन्वयाने बचाव कार्य सुरु ठेवावे व जखमींना तातडीने रुग्णालयांत हलवून व्यवस्थित उपचार मिळतील असे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

केंद्राकडून २ लाखांची मदत :

मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागामध्ये झालेल्या दुर्घटनांमुळे आत्तापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनांमधील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चेंबूर, विक्रोळी दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून २ लाखांची मदत

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ