in

वादग्रस्त वक्तव्यांसाठी परिचीत तीरथ सिंह रावत पुन्हा बरळले

उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुलींच्या फाटक्या जीन्सवरून केलेल्या वक्तव्यामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रावत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अमेरिकेनं भारतावर २०० वर्ष राज्य केलं, असं विचित्र वक्तव्य रावत यांनी केलं आहे. तसंच जेव्हा वेळ होता तेव्हा तुम्ही २० मुलं जन्माला घातली नाहीत हा तुमचा दोष आहे, असंही रावत बरळले आहेत.

२० मुलं का जन्माला घातली नाहीत –
कोरोना काळात सरकारनं प्रत्येक घरात प्रती यूनिट ५ किलो रेशन दिलं. ज्यांना १० मुलं होती त्यांना ५० किलो धान्य मिळालं, ज्यांना २० अपत्य होती त्यांना क्विंटलभर रेशन मिळालं. यात तुम्ही दुसऱ्यांवर का जळत आहात. त्यांना इतकं रेशन मिळालं यात जळण्यासारखं काय आहे. जेव्हा वेळ होती तेव्हा तुम्ही २ अपत्य जन्माला घातली, २० मुलांना का जन्म दिला नाही, असं रावत म्हणाले.

अमेरिकेनं २०० वर्ष गुलाम बनवून ठेवलं –
भारताला २०० वर्ष गुलाम बनवून ठेवणारी अमेरिका कोरोना संकटामुळे हादरली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतानं कोरोनाचा योग्यरितीनं सामना केला. अशातच आपल्याला २०० वर्ष गुलामीत ठेवणारी अमेरिका आज संघर्ष करत आहे. अमेरिकेचा मृत्यूदर मोठा आहे, असं विचित्र विधान रावत यांनी केलं आहे.

फाटक्या जीन्सवरून वाद –
एका कार्यक्रमाला संबोधित करताना रावत यांनी काही किस्से सांगितले होते. त्यात त्यांनी फाटक्या जीन्स घातलेल्या तरुणी किंवा महिला देशाला काय संस्कार देणार, असं वक्तव्य केलं होतं. तीरथ सिंह रावत यांच्या या वक्तव्यावरून बरंच वादंग निर्माण झालं होतं. संपूर्ण देशभरातून रावत यांच्यावर टीकेची झोड उठली होती. अशातच त्यांनी पुन्हा एकदा दोन वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परमबीर सिंहांवरच लेटरबॉम्ब; करिअर उद्ध्वस्त केल्याचा पोलीस अधिकाऱ्याचा आरोप

मुंबईतील ‘या’ भागात १२ तास पाणीपुरवठा नाही