in

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा ठरला; नुकसानीची माहिती घेणार

तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. दोन दिवसाच्या दौऱ्यानंतर अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेणार आहेत.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत हे कोकणच्या दौऱ्यावर आहेत. कोकणातील नुकसानीची पाहणी केल्यानतंर उदय सामंत यांनी येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकणात येऊन नुकसानीची पाहणी करणार असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा दोन दिवसांचा असेल. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे शुक्रवारी कोकणातील नुकसानीची पाहणी करतानाच ग्रामस्थांशीही संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते एक आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे सुद्धा उद्या 20 मे रोजी कोकण दौऱ्यावर जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत.तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज (बुधवार) रायगड, उद्या रत्नागिरी, तर परवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जातील. त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर असणार आहेत. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी फडणवीस तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अखेर ‘अप्सरा’ कुणाल बेनोडेकरसोबत विवाह बंधनात!

”नितीन गडकरी पंतप्रधान असायला हवेत”,काँग्रेसच्या बड्या नेत्याचे विधान…