in

रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; सतर्क राहून बचावकार्य करण्याचे आदेश

रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातला असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सर्व यंत्रणांनी पुढील इशारा लक्षात घेऊन सावधपणे आणि काळजीपूर्वक काम करावे. कोविड रुग्ण असतील त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. यावेळी मुख्य सचिवांनी एनडीआरएफच्या तुकड्या , स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान, सागरी तटरक्षक दलाचे जवान हे स्थानिक नागरिकांची मदत घेऊन काम करीत आहेत अशी माहिती दिली.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘बघ समाजा व्यथा वेश्येची’ अस राजेश्वरी खरात का म्हणतेय ?

Monsoon Alert | कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड ॲलर्ट