in

Co-Win Registration | प्रौढांसाठी २४ एप्रिलपासून नोंदणी सुरू, जाणून घ्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया

येत्या 1 मे पासून 18 वर्ष असणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण केले जाणार असून त्यांची नोंदणी पुढील ४८ तासात सुरू होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आर एस शर्मा यांनी दिली आहे.कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड या या देशी लसींव्यतिरिक्त काही केंद्रांवर रशियन लस स्पुटनिक व्ही ही लस देखील उपलब्ध असणार आहे. तर वेगाने लसीकरण होण्यासाठी अधिक केंद्रे आणि खाजगी सुविधा देखील उभारण्यात येत आहेत.

अशी करा लसीसाठी नोंदणी

 • Co-Win registration अ‍ॅपवर तुम्हाला तुमचे नाव रजिस्टर करावे लागेल.
 • त्यासाठी तुम्हाला https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जाऊन स्वतःचा मोबाईल नंबर नोंदवावा लागेल.
 • तुम्हाला आधार क्रमांक, पॅन क्रमांक वा इतर नोंदणीकृत ओळखपत्राची नोंद करावी लागेल.
 • त्यानंतर आपल्याला वैध मोबाईल नंबर नोंदवावा लागेल. त्यानंतर गेट ओटीपी बटणावर क्लिक करा.
 • तुम्ही पोर्टलवर रजिस्टर केलेला मोबाईल नंबर वापरून लॉगिन करा. तुम्हाला या नंबरवर एक OTP येईल.
 • ओटीपी नोंदवून व्हेरिफाय बटणावर क्लिक करावे लागेल.
 • एकाच नंबरवर तुम्ही व आणखी ३ मेंबर्स रजिस्टर करू शकता.
 • त्यानंतर तुमचा जिल्हा, त्यातलं शहर, वॉर्ड वा पिन कोड हे निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्रांची यादी दिसू लागेल. तुम्हाला हवे असलेले लसीकरण केंद्र तुम्ही निवडू शकतात.
 • लसीकरणाची तारीख निवडा, ज्याठिकाणी आपल्याला स्लॉट दिला जाईल. एकेका केंद्रावर क्लिक करून तुम्ही तिथे कोणत्या तारखेचे स्लॉट उपलब्ध आहेत, हे तपासू शकता. त्यातला तुमच्या सोयीचा स्लॉट निवडा आणि नक्की करा.
 • ज्या केंद्रावर पैसे भरून लस घ्यावी लागणार आहे, तिथे Paid असा पर्याय तुम्हाला दिसेल.
 • या अपॉइंटमेंटच्या दिवशी लस घ्यायला जाताना तुम्ही ज्या ओळखपत्राच्या आधारे नोंद केलेली आहे, ते सोबत न्यायला विसरू नका.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ऑक्सिजन बेड न मिळाल्याने ‘त्या’ वृद्धाचा मृत्यू

संकटकाळात नफेखोरीला केंद्राकडून मान्यता कशी?; सोनिया गांधींचे मोदींना पत्र