in

Tokyo Olympic | ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक खेळाडूला मिळणार १४ ‘कंडोम’

जपानच्या टोकियो शहरात होणाऱ्या ऑलिम्पिक सामन्यांदरम्यान खेळाडूंना मोफत कंडोम वाटण्यात येणार आहेत. सुमारे १,६०,००० कंडोमचे वाटप यंदा होणार आहे. परंपरेनुसार यंदाही कंडोम वाटपाचा निर्णय आयोजकांनी कायम ठेवला आहे.

ऑलिम्पिक आयोजन समितीने स्पर्धा सुरू असलेल्या ठिकाणी खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या मोफत कंडोमच्या वापराला मनाई केली आहे. ऑलिम्पिकची आठवण म्हणून हे कंडोम घरी आपल्या देशात घेऊन जायचे असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. खेळाडूंनी आपल्या देशात गेल्यावर याचा वापर करावा, अशी आयोजन समितीची भूमिका आहे.

ऑलिम्पिक आणि कंडोमची परंपरा

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने १९८८पासून खेळांदरम्यान कंडोमचे वाटप करण्याची प्रथा सुरू केली. एचआयव्ही एड्स आणि लैंगिक आजारांना आळा घालण्यासाठी ही प्रथा सुरू करण्यात आली. मागील ऑलिम्पिकच्या तुलनेत टोकियो ऑलिम्पिकमध्ये कमी कंडोमचे वाटप केले जाणार आहे. याआधीच्या रिओ ऑलिम्पिकच्या काळात ऑलिम्पिक समितीने ४,५०,००० कंडोमचे वाटप केले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

New indian labor law | देशात नवीन कामगार कायदे येणार.. भत्ते व सवलतींमध्ये मोठे बदल

‘त्या’ बाळाची झुंज अपुरी… पालघरमधील सहा दिवसांचे अर्भक दगावले